10th marathi gosht arunimachi,गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी,gosht arunimachi,,गोष्ट अरुणिमाची
लेखिकेचा परिचय
सुप्रिया खोत (१९८०)
सुप्रिया खोत या मराठी भाषेतील वृत्तपत्रे व मासिके यांद्वारे लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी 'छात्र प्रबोधन', पुणे येथे काही काळ साहाय्यक संपादिका म्हणून काम केले आहे.
लेखिकेचे साहित्यलेखन
महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषिवल यांतून त्यांची सदरे प्रसिद्ध झाली आहेत.
पाठाची पार्श्वभूमी
प्रस्तुत पाठ हा 'छात्र प्रबोधन, मार्च २०१६' या मासिकातील असून जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद या साऱ्या गुणांचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्त्व 'अरुणिमा' हिचा जीवनप्रवास या पाठातून रेखाटला आहे. अपंगत्वाने खडतर बनलेल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा तिने हार न मानता कसा गाठला, आपला आदर्श जगासमोर कसा ठेवला, तिथपर्यंतचा तिचा प्रवास' या साऱ्याचे वर्णन सुप्रिया खोत यांनी सविस्तरपणे केले आहे. स्पष्ट ध्येयाला आत्मविश्वास, जिद्द, प्रयत्नांची जोड दिल्यास यशप्राप्ती निश्चित असते या गोष्टीची जाणीव प्रस्तुत पाठ आपणास करून देतो.
पाठातील मुख्य मुद्दे:
- अरुणिमा सिन्हा:
एक सामान्य तरुणी, जी रेल्वे अपघातात आपला पाय गमावते, पण जिद्द आणि धैर्याने पुन्हा उभी राहते. - एव्हरेस्टची चढाई:
एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती अपघातानंतरही सराव करते आणि यशस्वीपणे शिखर गाठते. - प्रेरणादायी प्रवास:
हा धडा जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल बोलतो, जो कोणत्याही आव्हानावर मात करण्यास मदत करतो. - शारीरिक आणि मानसिक बळ:
धडा केवळ शारीरिक बळावर नव्हे, तर मानसिक बळावर आणि दृढनिश्चयावर अधिक लक्ष केंद्रित करतो.
पाठातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
- अग्निदिव्याला सामोरे जाणे :- अतिकठिण प्रसंगांना सामोरे जाणे.
- आवर घालणे :- लगाम लावणे, बंधन घालणे.
- अंतरंग घायाळ करणे. : मन दुखावणे.
- जीवनमरणाच्या सीमारेषेवर असणे : कधीही मृत्यू येईल अशा अवस्थेत असणे.
- डाव साधणे : संधी साधणे.
- तावून सुलाखून निघणे : अनंत अडचणीतून सहीसलामत बाहेर पडणे,
- देवाघरी जाणे : मृत्यू येणे
- पित्त खवळणे : खूप राग येणे.
- भावनेच्या आहारी जाणे. : भावनाविवश होणे.
- लक्ष वेधून घेणे : लक्ष आकर्षित करणे
- लाथा बुक्क्यांचा प्रसाद देणे. : खूप मारणे.
- वावड्या उठणे : अफवा पसरणे.
- विचलित करणे : एखादया विचारापासून लक्ष दूर नेणे.
- शुद्ध हरपणे. : बेशुद्ध होणे.
- शिरोधार्य मानणे. : समोरच्याचे सांगणे मनापासून मान्य करणे.
- सर करणे : जिंकणे.
- सहनशक्तीचा अंत होणे. : सहन करण्याची क्षमता संपणे.
- सिद्ध करणे : पटवून देणे.
पाठात आलेल्या संकल्पना :
AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) :
नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र :




COMMENTS